मध्य रेल्वेच्या ३५६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेवरील लोकल, मेमू आणि डेमू गाडय़ांच्या १० हजार ३४९ डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल डब्यांतही कॅमेरे बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ३५६ कोटी रुपये आहे.
 
 
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. मध्य रेल्वेने कॅमेऱ्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवले होते. यासंदर्भात अर्थसंकल्पात  प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती  मध्य रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. 
 
 
 
मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकलबरोबरच दिवा ते रोहा, दिवा ते वसई मार्गावर धावणाऱ्या मेमू गाडय़ा आणि पुणे येथे लोकल व नागपूर आणि आणखी एका भागात डेमू गाडी धावते, अशा सर्व डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे.  ९० टक्के लोकल व मेमू या मुंबईत आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात काम हे मध्य रेल्वेच्या मुंबईसाठीच होईल. सध्या २५ महिला डब्यांतच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
 
 
मध्य रेल्वेच्या काही प्रकल्पांना मिळालेला निधी
बेलापूर ते पनवेल दुहेरी मार्ग – ५ कोटी रुपये 
ठाणे ते तुर्भे ते नेरुळ ते वाशी मार्ग – १ कोटी रुपये
कल्याण ते कसारा तिसरा मार्ग – १० कोटी
बेलापूर ते सीवूड ते उरण विद्युतीकरण दुहेरी मार्ग – १५३ कोटी रुपये
सीएसएमटी ते पनवेल अंधेरी १२ डबा लोकल हार्बर – ५ कोटी रुपये
पुणे ते लोणावळा तिसरा व चौथा मार्ग – १ कोटी
३३७ एटीव्हीएम बदलण्यासाठी चार कोटी १४ लाख रुपये मिळणार आहे.