पालघर जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पालघर,
 
 
 
पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यांमध्ये शुक‘वारी दिवसभरात भूकंपाचे सहा धक्के बसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून पुणे येथून एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज तातडीने दाखल झाल्या असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
 
पालघर जिल्ह्यातील मागील तीन महिन्यापासून भूकंपाचे लहान मोठे धक्के बसत आहेत. शुक‘वारी सायंकाळपर्यंत एकूण चार धक्क्यांचा अनुभव नागरिकांनी घेतला. यातील सर्वात मोठ्या धक्क्याची रिश्टर स्केलवरील नोंद 4.1 इतकी होती. दुर्दैवाने एका बालिकेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाकडून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दल अर्थात एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, शनिवारी दोन तुकड्यांमध्ये 80 जवान दाखल झाले असून ते 24 तास दक्ष राहणार आहेत. आपत्कालिन स्थितीसाठी डहाणूतील धुंदलवाडीत तातडीने 200 तंबूंची व्यवस्था केली आहे. तसेच, ज्या भागात भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले, त्या भागात आवश्यक ते मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. शिवाय जनजागृतीही सुरू करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
 
 
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या भागात वारंवार बसत असलेले भूकंपाचे धक्के लक्षात घेता कुडाच्या घरांमध्ये निवारा करण्याची सूचना करण्यात आली आहे.