तिवस्यातल्या पिंगळाई नदीपात्रात आधुनीक रिचार्ज बंधारेकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे मिळाले सहकार्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
तिवसा येथील पिंगळाई नदीवर पाण्याचे पुर्नभरण करण्यासाठी आधुनिक पध्दतीचे
रिचार्ज बंधारे बांधल्या जाणार असून केंद्र सरकारच्या जलसंपदा व नदी
विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय भूमीजल बोर्डाच्या
अधीकार्‍यांच्या एका चमूने नुकतीच पाहणी करून बंधारे बांधण्याचा निर्णय
घेतला आहे.
 
 

 
 
 
 
 
पथकातील तांत्रीक कार्य सांभाळणार्‍या अधिकार्‍यांनी पिंगळाई नदीपात्रात
आटोमॅटिक सॉईल टेस्ट युनिटच्या साहाय्याने परीक्षण केले आहे. ज्या ठीकाणी
रिजार्च बंधारे बांधले जाणार आहे, तेथील तांत्रिक मोजमाप घेण्यात आले
आहे. अश्या प्रकारचे बंधारे अमेझॉन नदीच्या पात्रात बांधण्यात आले आहे.
त्याच धरतीवर पिंगळाई नदीवर बंधारे बांधल्या जाणार आहे. तिवसा व
आसपासच्या परीसरात पाण्याची टंचाई वर्षानूवर्षापासुन असल्यामुळे
भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य निवेदीता दिघडे-चौधरी यांनी केंद्रीय
जलसंपदामंत्री नितिन गडकरी यांच्याकडे या भागातील नदीविकासाची मागणी
2017 मध्ये केली होती. त्याची दखल घेवून नितीन गडकरी यांनी केंद्रीय
भुमीजल बोर्डाच्या शास्त्रज्ञांची चमू तिवसा येथील पिगंळाई नदीच्या
भौगलिक स्थितीची पहाणी करण्यासाठी नुकतीच पाठविली होती. या चमूमध्ये
शास्त्रज्ञ डॉ. पि.के.जैन, एस.के.भटनागर, परवेज खान यांच्यासह अन्य
अधिकार्‍यांचा समावेश होता. यावेळी भाजपाच्या निवेदिता दिघडे, दिलीप
नागरींगे, नगरपंचायतचे मुख्याधीकारी सचिन गाडे, स्वप्नील भुयार, शेतु
देशमुख व परीसरातील शेतकरी उपस्थित होते.
 
 

 
 
20 कोटी खर्च, 5 ठिकाणी बंधारे 
पिगंळाई नदीच्या परीसरात 5 विविध ठिकाणी आधुनिक पध्दतीचे रिचार्ज बंधारे
बांधल्या जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर असे बंधारे भारतात प्रथमच बांधले
जाणार आहे. या बंधार्‍यांना ऑटोमॅटिक रिडायल गेट असणार आहे. पारंपारीक
कोल्हापरी बंधार्‍यांना लोखंडी गेट असतात व ते अलग अलग करुन लावल्या
जातात. त्यातून पाण्याची गळती होवुन ते गेट चोरी जातात. रिचार्ज
बंधार्‍यांसाठी ऑटोमॅटीक रिडायल गेट असल्यामुळे रिचार्ज शाफ्टच्या
माध्यमातून आसपासच्या परीसरातील विहीरींची पाण्याची पातळी वाढुन ओलित
करणे सुकर होणार आहे. 300 मिटर लांब भागाचे खोलीकरण आधुनिक रिचार्ज
बंधार्‍यासाठी होणार आहे. लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता केंद्र
शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाकडून मिळणार असल्याची माहीती शास्त्रतज्ञ डॉ
पि.के. जैन यांनी उपस्थितांना दिली. भाजपाच्या निवेदिता दिघडे चौधरी
यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे
मंत्रालयातील दालनात भेट घेवून बंधार्‍यांची कामे लवकर मार्गी लावण्याची
मागणी केली आहे.