अमेरिकेचा निषेध करणारे निवेदन भारताकडून जारी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली, 
 
 
अमेरिकेतील बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थ्यांना अटक करण्याच्या अमेरिकेच्या कारवाईचा भारत सरकारने आज शनिवारी तीव‘ निषेध केला आहे. या घटनेचा निषेध करणारे अधिकृत निवेदनच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केले आणि या विद्यार्थ्यांना तातडीने कॉन्स्युलर मदत उपलब्ध करण्याचे आवाहन केले.
 
 
 
या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यामुळे उद्‌भवलेल्या स्थितीवर आमची बारीक नजरआहे. ही स्थिती हाताळण्यासाठी आम्ही आवश्यक ती पावलेही उचलली आहेत, असे मंत्रालयाचे प्रवक्ते रावीश कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
अमेरिकेतील बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल अमेरिकन पोलिसांनी एकूण 130 विदेशी विद्यार्थ्यांना अटक केली. यातील बहुतांश विद्यार्थी हे भारतीय आहेत.
 
  
 
दरम्यान, भारत सरकारने अमेरिकेचा निषेध करणारे निवेदन तुम्हाला प्राप्त झाले काय, असे अमेरिकन दूतावासातील एका वरिष्ठ अधिकार्‍याला विचारले असता, होय आम्हाला हे निवेदन मिळाले असून, आम्ही ते स्वीकारले आहे.