भीमा कोरेगाव हिंसाचार; आनंद तेलतुंबडे यांना अटक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप असलेले आनंद तेलतुंबडे यांचे न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी मुंबईत ही कारवाई केली आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरु आहे. पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.
 
आनंद तेलतुंबडे यांनी पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये जे मेल मिळाले आहेत, त्यानुसार तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन कोरेगाव भीमा विषय ज्वलंत ठेवावा असे सूचित करण्यात आले. मात्र हा मेल बनावट असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. आनंद तेलतुंबडे हे अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून २०१७ ला पॅरिसला गेले होते. त्याचा खर्च हा त्या विद्यापीठाने केला होता.या दौऱ्याचा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही, असेही बचावपक्षाचे म्हणणे होते. न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. 
 
 
सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल दिला. न्यायालयाने तेलतुंबडे यांचा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मुंबई विमानतळावरुन ही कारवाई करण्यात आली. त्यांना दुपारपर्यंत पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे.