सचखंड एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
औरंगाबाद येथील दौलताबाद रेल्वे स्टेशनवर मोठी रेल्वे दुर्घटना टळली असून या गाडीचे इंजिन डबे सोडून थोडे पुढे गेले होते. अमृतसरहून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसचे कपलिंग सकाळी ११.१५ च्या सुमारास तुटले होते. तसेच काही वेळाने हे इंजिन मागे आणून एक्स्प्रेसच्या डब्यांना जोडण्यात आले.
 
 
घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसला अचानक फलाट क्रमांक तीनवर बोलवावे लागले . यामुळे प्रवासीही काही वेळ गोधळले होते. सचखंड एक्स्प्रेस ही सुपरफास्ट गाडी आहे. या गाडीच्या इंजिनाची प्रत्येक महत्त्वाच्या थांब्यावर नियमित तपासणी होते. मनमाडहून निघताना इंजिन तपासण्यात आले नव्हते त्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे असे औरंगाबाद रेल्वे कार्यालयाने सांगितले आहे.