श्रीलंकेच्या करुणारत्नेच्या मानेवर चेंडू आदळला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी श्रीलंकेच्या सलामी फलंदाज दिमुथ करुणारत्नेच्या मानेवर पॅट कमिन्सचा उसळी मारलेला चेंडू आदळल्याने तो जबरदस्त जखमी झाला. परंतु आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
 
 
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 534 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने व लाहिरू थिरीमानेने डावाची चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 90 धावांची भागीदारी केली, परंतु 32 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर थिरीमाने बाद झाला. तत्पूर्वी करुणारत्नेच्या डोक्यावर चेंडू आदळला व तो जमिनीवरच कोसळला. त्याच्या मदतीला वैद्यकीय अधिकारी धावले, परंतु प्रथमोपचारानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
 
 
डावखुर्‍या करुणारत्नेने 85 चेंडूत 5 चौकारांसह 46 धावा केल्या. जेव्हा कमीन्सचा वेगवान चेंडू उसळला, तेव्हा त्या चेंडूपासून वाचण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु चेंडू मानेवर आदळला.