तभाचे काथवटे, जोशी यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
चंद्रपूर,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर शनिवार, 2 फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय 7 व्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने दै. तरुण भारतचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर काथवटे व गोंदिया जिल्हा प्रतिनिधी राहुल जोशी यांना सन्मानित करण्यात आले.
 
 

 
 
 
 
 
 
7 व्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी व्यसनमुक्तीच्या कार्यात भरीव योगदान देऊन लिखाण केल्याबद्दल नंदकिशोर काथवटे व राहुल जोशी यांना 2017-2018 चा व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने अनुक्रमे संमेलनाध्यक्ष डॉ. अभय बंग आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. यांच्यासह 2017-18 साठी मुंबई येथील रश्मी पुराणिक, भीमराव शिवराव मगरे, श्रावणी सतीश मदभावे, बाजीराव काशिनाथ दीक्षित, अनंतराव सीताराम दरवसे, केशव धोंडीबा चौधरी, शाहीर हेमंतराजे पुरुषोत्तम मावळे, किशोर काळोखे, सर्जेराव कृष्णा कचरे, सचिन ज्ञानदेव खांडेकर, राजेंद्र बाबुराव पाटील, समीर सुधाकर देशपांडे, दिग्विजय एकनाथराव देशमुख, सुधीर नारायण वसाने, निवृत्ती काशिनाथ देशमुख, पुष्पावती मधुकर पाटील, लक्ष्मण मेहर, संध्या प्रतिक राऊत व अनिल वामन डोंगरे, दयाराम कवळू पंधरे, जयंत मदनलाल शुक्ला, ठुमेश्वर पुडलिक मने, डमदेव पांडुरंग कहालकर, डॉ. धनंजय विठ्ठल हंगे, स्वप्निल विलास चंदने व निरंजन मुरलीधर भाकरे, शाहीर नानाभाऊ उत्तम परिहार, खान अब्दुल रशीद रहमान व तत्वशील बाबुराव कांबळे, अजिनाथ दशरथ शेरकर लातूर, मारोती तुकाराम पवार, जयकृष्ण अजाबराव खडसे व शिवजमंगल हिरामण चव्हाण, प्रेमलता प्रकाश सोनोने बुलढाणा व सुचिता पाटेकर यांचाही राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
 
 
 
 
2017-18 मध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या संस्थांमध्ये गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई, भूमिका फाऊंडेशन रायगड, विनायकराव जोशी काका सेवा संस्था सावळज सांगली, सायली बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर, ग्रामीण विकास संस्था पाडळी, औरंगाबाद, गुरुदेव सेवा आश्रम उत्तमसरा नागपूर, राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था सुंदरखेद बुलढाणा, गोिंवदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा गडचिरोली, लोकविकास सामाजिक संस्था नाशिक व राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठान देगलूर नांदेड यांचा समावेश आहे.