‘ठाकरे’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. नवाजुद्दीन सिद्दिक्की प्रमुख भूमिकेत असलेल्या 'ठाकरे' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल ३१.६० कोटींची कमाई केली असून पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास २३ कोटींची कमाई केली. 'ठाकरे' चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांत प्रदर्शित करण्यात आले आहे. 
 
ठाकरे चित्रपटा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सहा कोटींची तर दुसऱ्या दिवशी १० कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी ६.९० कोटींची कमाई केल्यानंतर तीन दिवसांत आकडा २३ कोटींवर पोहोचला होता.
 
 
 
 
 
 
 
ठाकरे चित्रपटासोबत कंगनाचा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मणिकर्णिकामुळे ठाकरे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र ठाकरे चित्रपट आपला प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत आणण्यात यशस्वी ठरल आहे.