विदर्भ-सौराष्ट्र अंतिम सामना आजपासून
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
 
नागपूर, 
 
 
 
अवघ्या दीड दिवसातच केरळ संघाचा एक डाव आणि 11 धावांनी धुव्वा उडवित दिमाखात रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या गतविजेत्या विदर्भ संघाची अंतिम लढत सौराष्ट्र संघासोबत होणार आहे. या पाचदिवसीय सामन्यात विदर्भ संघ आपले अिंजक्यपद कायम राखणार काय? याकडे सर्व कि‘केटप्रेमींचे लक्ष्य लागले आहे. जामठ्यातील व्हीसीएच्या मैदानावर प्रथमच रणजी स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.
 
 
एकीकडे गतविजेता विदर्भा संघ सलग दुसर्‍यांदा अिंजक्यपद पटकावून इतिहास रचण्याच्या तयारीत आहे, तर तिकडे सौराष्ट्र संघसुद्धा अंतिम सामन्यात विजय मिळवून पहिल्यांदा अिंजक्यपद पटकाविण्यास उत्सुक आहे. त्यामुळे अंतिम सामना अधिक रोमहर्षक होणार यात शंकाच नाही.
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
फैझ फझलच्या नेतृत्वात आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनात खेळणार्‍या गतविजेत्या विदर्भाची साख
 ळी सामन्यात सुरुवात अतिशय निराशाजनकच झाली होती. त्यामुळे विदर्भ संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार काय याबाबत बराच संभ‘म होता. मात्र फलंदाजी व गोलंदाजीमध्ये सुधारणा करीत आठ साखळी सामन्यात गुणसं‘या 29 करीत विदर्भ संघाने अव्वल स्थानी भरारी घेत बादफेरीत प्रवेश केला होता. उपांत्यपूर्व सामन्यात दमदार फलंदाजी व भेदक अचूक मारा करीत उत्तराखंड संघाला नमवित विदर्भाने सलग दुसर्‍यावर्षी उपांत्य फेरी गाठली. उपांत्य लढतीत विदर्भ संघाने केरळ संघाला दीड दिवसात दोनदा ऑलआउट करीत आम्ही चॅम्पियन आहो, हे दाखवित अंतिम फेरीत धडक दिली.
 
 
 
 
विदर्भ संघाची फलंदाजी पाहिली तर कर्णधार फैझ फझलसह अनुभवी फलंदाज व या मोसमात विदर्भ संघाकडून सर्वाधिक 1003 धावा करण्याची कामगिरी जाफरने केली आहे. यात त्याच्या चार शतके व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. फझलने तीन शतक व दोन अर्धशतकांसह 726 धावा केल्या आहे. त्यानंतर अक्षय वाडकर 680 धावा करीत विदर्भच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मधल्या फळीतील फलंदाजांनीसुद्धा प्रतिकूल परिस्थितीत आपली जबाबदारी योग्यरीतिने सांभाळली आहे. सलामी फलंदाज संजय रामास्वामी पुन्हा फॉर्ममध्ये आला असून सौराष्ट्रविरुध्द डोंगर उभारण्यास सज्ज आहे.
 
 
 
 
 
गोलंदाजीत फिरकीपटू आदित्य सरवटे व अनुभवी अक्षय वखरे यांचा दबदबा राहिला असून आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने उपांत्य फेरीत केरळ संघाच्या फलंदाजांचे कंबरडेच मोडून टाकले होते. त्यामुळे वेगवान गोलंदाजीत रजनीशसह उमेश यादव विदर्भ संघात समावेश झाल्याने गोलंदाजीला चांगलीच धार निर्माण झाली आहे. जामठ्यावरील हिरवळ खेळपट्टीची गोलंदाजांना कशी मदत होते यावर दोन्ही संघाची भिस्त राहणार आहे.
 
 
 
 
 
 
कर्णधार जयदेव उनाडकटच्या नेतृत्वात सौराष्ट्र संघ आतापर्यंतच्या रणजी करंडकातील तिसर्‍यांदा अंतिम सामना खेळणार आहे. आतापर्यंत एकदाही स्पर्धेतील जेतेपद न मिळविलेल्या सौराष्ट्र संघ या सामन्यात विदर्भ संघाला त्याच्या घरच्या मैदानावर मात करून विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर संपूर्ण कसोटी मालिका गाजविणारा चिवट फलंदाज चेतेश्वर पुजारा संघात परतल्याने सौराष्ट्र संघ अधिक मजबूत झाला आहे. तर युवा फलंदाज शेल्डन जॅक्सनने उपांत्य सामन्यात कर्नाटक संघाविरुद्ध शतक झळकावून संघाला अंतिम फेरीत पोहचविले. त्यामुळे त्याच्याकडे भरवशाचा फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याच्यासह डी. जडेजा, प्रेरक मंकड, के. मकवाना यांच्यावर जबाबदारी आहे. उत्कृष्ट फलंदाजी व भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघावर विजय मिळविण्यास सौराष्ट्र संघ उत्सुक आहे.
 
स्थळ ः व्हीसीए जामठा स्टेडियम
वेळ ः सकाळी 9.30 वाजतापासून
 
प्रतिस्पर्धी संघ असे-
विदर्भ ः फैझ फझल (कर्णधार), गणेश सतीश, रजनीश गुरबानी, वसीम जाफर, अक्षय कर्णेवार, ललित यादव, संजय रामास्वामी, आदित्य सरवटे, अथर्व तायडे , आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर, श्रीकांत वाघ, अपूर्व वानखेडे, सिद्धेश वाठ.
 
सौराष्ट्र ः जयदेव उनाडकट (कर्णधार), अर्पित वसावद, हार्विक देसाई, शेल्डन जॅक्सन, धर्मेंद्र सिन्ह जडेजा, चिराग जानी, कमलेश मकवाना, प्रेरक मंकड, किशन परमार, स्नेल पटेल, चेतेश्वर पुजारा, हार्दिक राठोड, शौर्य सानंदिया, जयदेव शाह, समर्थ व्यास.