उन्हाळी भुईमूग
   दिनांक :20-Feb-2019
भुईमूग हे प्रमुख तेलबिया पीक असून, हे पीक प्रामुख्याने उन्हाळ्यात घेतले जाते. या पिकावर पीक हंगामामध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. आपण या किडींचे वेळीच नियंत्रण केले नाही तर पिकाचे नुकसान संभवते. सर्वसाधारण किडीमुळे 10-30 टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते. म्हणून शेतकरीबंधूंनी किडीचे नियमित सर्वेक्षण करून खालील उपाययोजना कराव्या-
फुलकिडे : फुलकिडे हे पिवळसर िंकवा काळपट रंगाचे, सूक्ष्म आकाराचे व लांबोळके असतात. त्याची पिले व प्रौढ पानांच्या पृष्ठभागावर खरचटून त्यामधून स्रवणारा द्रव शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि पानाच्या कडा वरच्या भागाने मुडपल्या जातात. पानावर हिरवट रंगाचे चट्टे पडतात. प्रादुर्भावाची तीव्रता जास्त असल्यास झाडाची वाढ खुंटते आणि पाने वाळून जातात.

 
 
उपाययोजना : जास्त तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असल्यास फुलकिड्यांची संख्या वाढते. ओरियस मॅग्झीडेरेग्झ आणि ओरियस टँटिलस तसेच लायस एग्झटेनोनेटलस, सिम्नस नुबीलीस व क्रायसोपा फुलकिड्यांचे भक्षक आहेत. त्याचे संवर्धन करावे. मका पिकाचे आंतरपीक घेतल्यास फुलकिड्यांचा प्रार्दुभाव कमी होतो. पेरणीपासून 40 दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे. 5 फुलकिडे, शेेंडा ही आर्थिक नुकसान संकेत पातळी आढळल्यास- िंनबोळी अर्क 5 टक्के िंकवा लँब्डा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 4.0 ते 6.0 मिलि. िंकवा क्विनालफॉस 25 टक्के प्रवाही 28 मिलि. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी िंकवा क्विनॉलफॉस 1.5 टक्के भुकटी 23.3 किलो/हे. प्रमाणे फवारणी करावी.
•