सोयाबीन लागवडीपूर्वी
   दिनांक :20-Feb-2019
सोयाबीन बियाण्याच्या पेरणीनंतर ते उगवले नसल्याचे प्रकार उघडकीस आलेे. त्यामुळे हे बियाणे वापरासंबधी शेतकर्‍यांनी योग्य काळजी घ्यावी. सोयाबीनचेे बियाणे तपासण्यासाठी कृषी विभागाने काही टीप्स दिल्या आहेत. त्याच्या सहाय्याने शेतकरी सोयाबीन बियाण्याची गुणवत्ता सहज तपासू शकतात.

 
 
खरं तर सोयाबीन बियाण्यांची तपासणी उगवण क्षमता चाचणीपासून सुरू होते. उगवणक्षमता 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्याच प्रमाणात अधिकचं बियाणं पेरणीकरता वापरणं योग्य ठरणार आहे. स्वत:कडील बियाणं पेरणीकरता वापरल्यास त्यावरील खर्च कमी होऊ शकणार आहे. सोयाबीनचं बियाणं अत्यंत नाजूक असतं. त्याचं बाह्य आवरण पातळ असतं आणि बियाण्यातील बिजांकूर तसंच मुलांकूर बाह्य आवरणालगत असतात. त्यामुळे बियाणं हाताळताना पुरेशी काळजी घ्यावी. साठवणूक करताना बियाण्यातील ओलीचं प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसावं. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास तीन ग‘ॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणाची बीज प्रक्रिया करावी. रायझोबियम आणि पीएबी प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर लावून सावलीत वाळवावं. सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी गंधकाची गरज असते. िंसगल सुपर फॉस्फेट खत दिलं तर पिकास स्फूरदाबरोबर गंधकाचा पुरवठाही होतो. त्यामुळे डीएपीऐवजी सरळ खताचा वापर करावा. कारण डीएपीमध्ये गंधकाचं प्रमाण नसतं. सोयाबीन पिकास 30 किलो नत्र, 60 किलो स्फूरद, 30 किलो पालाश, 20 किलो गंधक आणि 10 किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी द्यावं. मुखत्वे विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. तसंच पावतीवर उत्पादक कंपनीचं पूर्ण नाव, वाणाचे नाव, लॉट क्रमांक आदी तपशील असायला हवा. सोयाबीनची पेरणी पाऊस 75 ते 100 मि.मी. झाल्यानंतर तीन ते पाच सें.मी. खोलीपर्यंत करावी. अशा पध्दतीने केलेली पेरणी यशस्वी ठरेल.
पप