बिगर हंगामात करावयाच्या उपाययोजना
   दिनांक :20-Feb-2019
विदर्भात कापूस उत्पादक जिल्ह्यामधे बीटी कपाशीवर पुढील हंगाामामधे गुलाबी बोंडअळीची रोकथाम करण्यासाठी शेेतकरीबंधूंनी कोणत्याही परिस्थितीत कपाशीची फर्दड घेण्यासाठी नियोजन करू नये. सर्वसाधारण तीन ते चार वेचण्या झाल्याबरोबर कपाशीची उलंगवाडी करावी.
 
खलीलप्रकारे उपाययोजना कराव्या- कापूस साठवणूक व संकलन केंद्रे, जििंनग मिल्स इ. ठिकाणी कापूस येण्यास सुरुवात झाल्यापासून साफसफाई मोहीम राबवून, कापूस जििंनगनंतर चाळणीवरच्या अळ्या, कोष, कवडी व खराब कापूस इ.ची वेळोवळी त्वरित विल्हेवाट लावावी व त्या परिसरात बिगर हंगामात पूर्णवेळ प्रत्येकी 15 ते 20 फेरोमोन सापळे लावून सापळयामध्ये अडकलेले पतंग नियमित नष्ट करावेे.

 
 
पिकाचा हंगाम लवकर संपवावा- 160 ते 180 दिवसांत. हंगामाबाहेर पीक (फरदड) घेऊ नये. त्यामुळे किडींना अखंड अन्नपुरवठा उपलब्ध होत राहून त्या पुढील हंगामातील पिकांवर त्यांच्या एकमेकांवर पिढ्या तयार होउन संख्या वाढते. पर्यायाने कपाशीवर पात्या अवस्थेपासूनच मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.
कपाशीची शेवटची वेचणी संपल्याबरोबर लगेच शेतात जनावरे िंकवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. म्हणजे त्या कपाशीच्या झाडावर असलेल्या बोंडे, पाने इ. खाऊन टाकतील आणि त्यामुळे यावर किडींच्या अवस्था असल्यास त्या नष्ट होतील.
 
कीडग्रस्त बोंडांसहित पर्‍हाट्याचे यंत्राद्वारे कूट करून सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी. पर्‍हाट्याचे ढीग शेतात तसेच ठेवल्यास कीडक बोंडातील अळ्यांचे कोषात रूपांतर होऊन कोष तसेच पडून राहून पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढतो.
हंगाम संपल्याबरोबर लगेच खोल नांगरणी करवी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष उन्हाने िंकवा पक्ष्यांचे भक्ष होऊन नष्ट होतील.
 
दरवर्षी कापूस पिकाची योग्य पीक फेरपालट करावी म्हणजे जमिनीतील कोषातून निघालेल्या पतंगांना अंडी टाकण्यासाठी जागेवरच खाद्य (पात्या व फुले) उपलब्ध होणार नाही.
पूर्व मान्सून कपाशीची लागवड टाळावी म्हणजे पहिल्या पावसाबरोबर जमिनीतील कोषातून निघणारे पतंगांना खाद्य (पात्या व फुले) उपलब्ध न झाल्यामुळे ते अंडी न टाकताच मरून जातील व गुलाबी बोंड अळीची पहीली पिढी तशीच नष्ट होईल.
• विभाग प्रमुख,
कीटकशास्त्र विभाग,
डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला