उद्यापासून बारावीची परीक्षा
   दिनांक :20-Feb-2019
पुणे,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ मंडळांमार्फत घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्या, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसणार आहेत. यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८,१५१ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. 
 
परीक्षेचे वेळापत्रक २२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते.  कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा प्रथमच प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले होते. नऊ भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका तर, पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. राज्यात २ हजार ९५७ केंद्रावर परीक्षा होणार आहे.
 
मुंबईतील विद्यार्थिनी आयपॅडवर देणार परीक्षा
 
 
 
यंदा विशेष बाब म्हणून मुंबईतील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयातील निष्का नरेश हसनगडी ही दिव्यांग विद्यार्थिनी आय-पॅडवर परीक्षा देणार आहे. निष्काला लिहिता येत नाही, त्यामुळे तिला नियमानुसार तशी परवानगी देण्यात आली आहे, एक लेखनीक तिने आयपॅडवर टाइप केलेले उत्तर उतरपत्रिकेवर लिहणार आहे.असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले. यावेळी सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते.
 
अमरावती :
पाच जिल्ह्यातून १ लाख ४९ हजार ५९२ विद्यार्थी प्रविष्ठ 
 
वर्धा :
आठ तालुक्यातील ५१ केंद्र सज्ज : १८ हजार ३६१ विद्यार्थी देणार परीक्षा