राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता
   दिनांक :20-Feb-2019
-अमरावतीचे रणवीरसिंग राहल होते संघाचे प्रशिक्षक
 
अमरावती, 
राष्ट्रीय कॅडेट मुलींची कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच ओडिसातील कटक येथे झाली. त्यात महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. या संघाचे मुख्य प्रशिक्षक रणवीरसिंग राहल हे अमरावतीकर असून, त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

 
 
भारतीय कुस्ती संघाचे संयुक्त सचिव विनोद तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण गटातील उपविजेतेबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुस्ती प्रशिक्षक राहल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्पर्धेत महाराष्ट्राच्या रामनदिप संधू (गट व प्राप्त पदक - ६५ किलो, गोल्ड मेडल), श्रुती भोसले (६१ किलो, रौप्य पदक), अंकिता जाधव (४० किलो, कांस्यपदक), कल्याणी गाडेकर (४३ किलो, कांस्य पदक), स्मिता पटेल (४९ किलो, कांस्यपदक), दिशा कराड (५३ किलो, कांस्यपदक), भाग्यश्री फड (५७ किलो, कांस्यपदक), प्रतीक्षा बागडी ( ६९ किलो, कांस्यपदक) यांनी विविध पदके मिळवली.
 
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष शरण सिंह, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, पोलिस आयुक्त बावीस्कर, सचिव व्ही. एन. प्रसाद, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, ललित लांडगे, दिनेश गुंड, नवनाथ धुमाळ, प्रा.संजय तिरथकर आदींनी रणविरसिंग राहल व संघाचे अभिनंदन केले आहे.