माझे पदक शहीदांना समर्पित ः अमित पांघळ- स्ट्रॅण्डजा स्मृती बॉक्सिंग- भारताला 3 सुवर्णांसह 7 पदके
   दिनांक :20-Feb-2019
सोफिया, 
बल्गेरियाच्या सोफिया येथे आयोजित प्रतिष्ठेच्या स्ट्रॅण्डजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी तब्बल तीन सुवर्णदकाची कमाई केली. भारतीय बॉक्सर अमित पांघळ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, परंतु त्याने हे सुवर्णपदक पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित केले आहे.
 

 
 
मी स्वतः सैन्यदलाचा असल्यामुळे थोडे जास्त दुःख वाटते. मी पदक िंजकले असले तरी हे पदक मी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित करू इच्छितो, असे तो म्हणाला. आम्ही सोफियामध्ये दाखल झालो तेव्हा पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कळली, असेही त्याने सांगितले.
 
भारताने 3 सुवर्ण, 1 रौप्य व 3 कांस्यपदकांसह एकूण 7 पदके पटकावली आहेत. निखत झरीन (51 किग्रॅ) हिनेसुद्धा आपले पदक सीआरपीएफच्या शहीद जवानांना समर्पित केले. मीना कुमारी देवीने सुवर्णपदक पटकावले असून तिने 54 किग्रॅ वजनगटाच्या अंतिम सामन्यात फिलिपीन्सच्या आईरा विलेगासवर 3-2 अशी मात केली. गतवर्षी कांस्यपदक मिळविणार्‍या मीना कुमारीने यावेळी आपल्या पदकाचा रंग बदलविला. महिलांच्या 48 किग्रॅ वजनगटात 20 वर्षीय मंजू राणीने रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात तिला 2012 विश्व स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती फिलिपीन्सच्या जोसी गबुकोकडून पराभव पत्करावा लागला.