न्यूझीलंडच्या संसदेत पुलवामा हल्ल्याच्या निषेध ठराव
   दिनांक :20-Feb-2019
वेलिंग्टन,
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आता जगभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. यामध्ये न्यूझीलंडचाही आता समावेश झाला असून, या देशाच्या संसदेमध्ये पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
 
 

 
 
न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी बुधवारी हा ठराव त्यांच्या संसदेत मांडला. हा ठराव मांडताना ते म्हणाले की, 14 फेब्रुवारी रोजी भारताच्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. या घटनेच्या निषेधाचा ठराव मी मांडत आहे. याद्वारे भारताच्या या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, तसेच शहीदांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करीत आहोत.