कनार्टकमधून हटवले मुशर्रफ, इम्रान खान, शोएब अख्तरचे फोटो
   दिनांक :20-Feb-2019
बंगळुरू,
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील सीसीआय क्लब, मोहाली, राजस्थान व दिल्ली क्रिकेट संघटनांनी आपल्या स्टेडियममधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकल्यानंतर आता कर्नाटक क्रिकेट संघटनेनेसुद्धा पाकच्या खेळाडूंचे फोटो काढून टाकले आहेत.
 
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने जारी केलेल्या पत्रकानुसार बंगळुरूच्या स्टेडियमधून व मुख्यालयातून पाकिस्तानी खेळाडू आणि त्या संबंधित व्यक्तींचे फोटो हटवण्यात येत आहेत. या फोटोंमध्ये पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ, पतंप्रधान इम्रान खान, शोएब अख्तर, शोएब मलिक यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंचे फोटो होते.