पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प
   दिनांक :20-Feb-2019
वॉशिंग्टन,
पुलवामा दहशतवादी हल्ला ही भयानक घटना असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या घटनेबाबची माहिती मिळाली असून, या प्रकरणी योग्य वेळी आमचे म्हणणे जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
 

 
 
या हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला पूर्ण पािंठबा व्यक्त केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडिनो यांनी जाहीर केले आहे. या हल्ल्याला जबाबदार असणार्‍यांना शिक्षा दिली जाईल, असेही पालाडिनो म्हणाले.
 
 
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढता तणाव पाहता दक्षिण आशियामधील हे दोन्ही शेजारी देश एकत्र आले तर खूपच चांगले होईल, अशी प्रतिक्रियाही ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
 
पुलवामा हल्ल्याच्या तपासादरम्यान पाकिस्तानने पूर्ण सहकार्य करावे आणि जबाबदार असणार्‍यांना शिक्षा करावी, असे आवाहन उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडिनो यांनी पाकिस्तानला केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचेही पालाडिनो म्हणाले.