समुद्रपूर खरेदी विक्री संस्थेतर्फे शहीद जवानांना श्रध्दाजंली
   दिनांक :20-Feb-2019
समुद्रपूर,
पुलवामायेथे झालेल्या भ्याड आतं की हल्यात ४२ पेक्षा जास्त जवान शहीद झाले . या शहीद जवानांना आज समुद्रपूर खरेदी विक्री संघाच्या मासीक सभा सुरु होण्या अगोदर संधाचे अध्यक्ष ॲड. सुधिर बाबू कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
 
या वेळेस उपाध्यक्ष सुरेंद्र कुकेकर, संचालक शांतीलाल गांधी, केशव भोले, व्यवस्थापक मोतीराम जीवतोडे, यांच्यासह अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते . सर्वानीं उभे राहुन दोन मिनीटे मौन राहून श्रद्धांजळी अर्पण केली.