अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास आजीवन कारावास
   दिनांक :21-Feb-2019
- मुलीला ५ लाखांची नुकसान भरपाई
  
 
अकोला, 
येथील जुन्या शहरातील अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा तसेच २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्याची आणखी शिक्षा आज गुरूवारी सुनावली.
  
जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील आरोपी प्रदीप उर्फ गोलू सुरेश दांडगे याने अल्पवयीन मुलीवर २०१३ मध्ये अत्याचार केला होता. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
 
न्यायालयाने या प्रकरणात ७ साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. गुन्हा सिद्ध झाल्याने पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश आरलँड यांनी या प्रकरणात आरोपी प्रदीप उर्फ गोलू सुरेश दांडगे यास आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्याची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. शासनाच्या योजनेनुसार अल्पवयीन पीडितेस ५ लाख रुपये देण्याबाबतही न्यायालयाने आदेश दिले.