कबाब
   दिनांक :21-Feb-2019
भारतातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, भौगोलिकता नेहमीच जगाच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. भारतावर होणारे परकीय आक्रमण असो, वा व्यापार या ना त्या कारणाने जोडल्या जाणार्‍या परकीय संस्कृतीला भारतीयांनी आपल्यात सामावून घेतले आहे. भारतात आपल्या पूर्वजांपासून सर्वांना सामावून घेण्याची मोकळीकता आपल्या संस्कृतीत राहिली आहे. यामुळे भारतातील बोली भाषा, खानपान, राहणीमान यात होणारे परिवर्तन आणि प्रयोग यामुळे भारतीय संस्कृतीत विलक्षण विविधता दिसून येते. परकीयांचे म्हणून आलेल्या अनेक संस्कृतीपैकी खाद्यसंस्कृतीही आज आपली शैली म्हणून आपल्यात आपण वाढवतो आहे. त्यात अनेक पदार्थ ज्याचा रूचकर चविची ओळख भारताने करून दिली आहे, ‘कबाब’ हा त्यातील एक पदार्थ.
 
बदलत्या भारतीय खाद्य परंपरेत मुघलांच्या शासन काळात बदल होऊ लागला होता. नवनवीन व्यंजन चाखण्याचा तयार करण्याचा या प्रवासात युद्ध दौरात स्वयंपाकी हे सुरक्षीत राहीले आहे. जो ही मुघल शासक हरला त्याचे स्वयंपाकी भारतीय राज्याच्या स्वयंपाक घरात काम करत असत. असेच भारतीय राजा मुघलांशी हरल्यावर होत असे आणि भारतीय राज्यांना मुघलांचे आणि मुघलांना भारतीयांचे पदार्थ चाखावयास मिळत असे. या प्रवासा दरम्यान जन्म घेतलेला एक पदार्थ म्हणजे ‘कबाब’ आहे. कितीतरी युद्ध पाहिल्यानंतर ‘कबाब’ ला भारतीय स्वयंपाक घरात स्थान मिळाले आणि आता मात्र संपूर्ण जगाला आपल्या रूचकर चविची भुरळ या पदार्थांनी घातली. या पदार्थांवर नवनवीन प्रयोग करून याचे उत्तम पदार्थ तयार होतात. यातलाच एक नवीन प्रकार म्हणजे ‘मटर कबाब’ आहे. भरपूर भाजी घरी आणून त्याचे वेगवेगळे खास चविष्ट पदार्थ बनवायचे. हे पदार्थ स्वत: खायचे आणि इतरांना खाऊ घालायचे.

 
 
हिवाळ्यातल्या ताज्या भाज्यांना छान ओलसर गोड चव असते. या ताज्या भाज्या, ओली धान्य, हिरवे ताजे मसाले, त्याला इतर काही थोड्या फार साहित्याची जोड दिली की भन्नाट चवीचे पौष्टिक पदार्थ सहज तयार करता येतात. थंडीत मिळणारे कोवळ्या मटरचे पौष्टिक ‘मटर कबाब’ आज आपण चाखणार आहोत.
 
मटर कबाब
साहित्य : एक वाटी ताजे मटार दाणे, अर्धी वाटी उकडलेला बटाटा (बटाटा उकडताना थोड मीठ घालावे), अर्धी वाटी पोह्याचे िंकवा लाह्यांचे पीठ, आले-मिरची पेस्ट, एक चमचा लसुन पेस्ट, एक चमचा धणे-जिरेपूड, कोिंथबीर, मीठ, तेल, बेड क्रम्बस, एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा दही.
कृती : मटर वाफवून घ्यावेत, बटाटा किसून घ्यावा, या मिश्रणात पोह्याचे पीठ, आले-मिरची पेस्ट, लसुन पेस्ट, धने-जिरपूड, कोिंथबीर, मीठ, बेड क्रम्बस, गरम मसाला, दही हे साहित्य छान एकत्र करून हव्या त्या आकारात कबाब स्टिकला (स्क्यूअर) आडकवून िंकवा तव्यावर शॅलोफ्राय बेक िंकवा डीप फ्राय करावेत.
-प्रमोदिनीनिखाडे
7083069584