शेतशिवारात आढळला दोन तोंडी साप
   दिनांक :21-Feb-2019
-आंतरराष्ट्रीय बाजारात सापाची किंमत लाखो रुपये 
-पोलिसांनी केले वनविभागाच्या स्वाधीन
 
वाशीम,
मंगरुळनाथ तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वारा जहांगीर येथील शेतशिवारात दोन तोंडया मांडूळ जातीचा साप असल्याची माहिती २० फेब्रुवारी चे रात्री ९ वाजता आसेगाव पोलिसांना मिळताच आसेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मांडूळ जातीच्या सापाला पकडून ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची किंमत लाखो रुपये आहे.  
 
 
 
मंगरुळनाथ तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम वारा जहांगीर ते कुंभी या रस्त्याने कलंदर खान यांच्या शेतामध्ये मांडूळ जातीचा दोन तोंड असलेला साप असल्याची माहिती भगवान केंद्रे यांनी आसेगाव चे ठाणेदार शेख यांना फोनद्यारे माहिती दिली की, ग्राम कुंभी ते वार रस्ताने कलंदर खान यांच्या शेतामध्ये एक मांडूळ जातीचा (दोन तोंड असलेला) साप मिळून आढळून आल्याचे सांगीतले. आसेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार शेख यांनी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक अमोल जाधव व ईतर कर्मचार्‍यासह माहिती घटनास्थळी धाव घेतली असता तेथे काही सुज्ञ नागरिकांनी सदर मांडूळ जातीचा साप सुरक्षित पकडून ठेवला होता. तो पोलिसांनी २ पंचासमक्ष ताब्यात घेऊन आसेगाव पोलिस ठाण्यात आणला.
 
ठाणेदार शेख यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती देऊन पोस्टे आसेगाव येथे वनरक्षक पोले यांच्या ताब्यात दिले. यावेळी कुंभी चे माजी सरपंच सुभाष कावरे व वारा चे उपसरपंच शेख हनिफ उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सापाची लाखो रुपये किंमत असल्याची यावेळी चर्चा होती.