विकोचे संजीव पेंढरकर ‘मुंबई हिरोज’ पुरस्काराने सन्मानित
   दिनांक :21-Feb-2019
मुंबई,
सामाजिक सौहार्द आणि वांशिक भेदभाव मिटविण्यासाठी कार्यरत ब्लॉसम इंडिया तर्फे मुंबईतील द एम्परर येथे आयोजित समारंभात विको लेबॉरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांना ‘मुंबई हिरोज अवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 

 
ब्लॉसम इंडिया तर्फे ह्युमॅनिटी फर्स्ट कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आली. त्यात मुंबई स्टॉक एक्सचेंजचे सीईओ हेमंत गुप्ता, संपादक सर्फराज आर्जे, टीव्ही ॲन्कर अतिका फारुखी, प. बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी, राज्याचे माजी पोलिस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा, आर्य समाजचे आचार्य मिथिलेश, पारशी पुजारी गुरु येजदी पंथाकी, भदंत डॉ. राहुल बोधी, कैसर खालिद, संस्थेचे विश्वस्त अतुल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्विकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना संजीव पेंढरकर यांनी, या बहुमानासाठी माझी निवड केल्याबद्दल मी आयोजकांना ऋणी आहे. यासंदर्भात मुंबईकरांकडून लाभलेले प्रेम तसेच विकोने व्यक्तिगत तसेच संस्था पातळीवर केलेल्या प्रयत्नांची ही पावती असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकारच्या उपक्रमांतून प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात वैयक्तिक पातळीवर बदल घडवून आणण्यास प्रेरक ठरतील असा विश्वास व्यक्त केला.