‘शॉपेट’ ठरणार जगातील सर्वात श्रीमंत मांजर
   दिनांक :21-Feb-2019
फ्रांस 
 
प्रसिद्ध फॅशन डिझायनर कार्ल लॅगरफेल्ड यांचे नुकतेच निधन झाले. लॅगरफेल्ड यांना कोणीच वारसदार नसून त्यांनी आपली सगळी मालमत्ता त्यांची लाडकी मांजर शॉपेट हिच्या नावावर केली असल्याची चर्चा आहे. यामुळे शॉपेट तब्बल 150 दशलक्ष डॉलर्सच्या संपत्तीची मालक ठरणार आहे.
 

 
 
लॅगरफेल्ड यांचे त्यांच्या माजंरीवरचे प्रेम जगप्रसिद्ध आहे. लॅगरफेल्ड त्यांच्या मांजरीला कधीही एकटी सोडत नसत. तिच्याशिवाय त्यांचे पानही हलत नव्हते. कोणत्याही कार्यक‘माला लॅगरफेल्ड गेले की त्यांची मांजर त्या कार्यक‘माचा केंद्रिंबदू बनायची. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये आपली सगळी संपत्ती शोपेटच्या नावावर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. खरेतर लॅगरफेल्ड यांना शॉपेटशी लग्नच करायचे होते, पण प्राण्यांशी लग्न करता येत नसल्याची खंत ते कायम व्यक्त करायचे. लॅगरफेल्ड शॉपेटशी कायम डोळ्यातून संवाद साधायचे.
 
शॉपेटचा स्वतंत्र फॅशन ब्लॉग आणि इन्स्टाग‘ाम पेजही आहे. तिच्या झगमगत्या आयुष्यावर ‘शॉपेट: द प्रायव्हेट लाइफ ऑफ अ हाय फ्लाइंग फॅशन कॅट’ नावाचे पुस्तकही लिहिण्यात आले आहे. लॅगरफेल्ड यांच्या मृत्यूनंतर शॉपेटची काळजी कोण घेणार, याची आता चर्चा आहे. पण त्यांचा मॉडेल ब‘ॅड क‘ोएनिग व त्याचा मुलगा हडसन शॉपेटची काळजी घेईल, असे बोलले जाते आहे. लॅगरफेल्ड यांनी सगळी संपत्ती मांजराच्या नावावर केली असली तरी फ‘ेंच कायद्याप्रमाणे पाळीव प्राणी संपत्तीचे मालक होऊ शकत नाहीत. त्यामुळे शॉपेटची काळजी घेणार्‍यांनाच ही संपत्ती मिळेल. या संपत्तीचा वापर त्यांना शॉपेटची काळजी घेण्यासाठी, तिचे संगोपन करण्यासाठीच करावा लागणार आहे.