' रिंकू ' ला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर चाहत्यांची गर्दी
   दिनांक :21-Feb-2019
‘सैराट’ चित्रपटातून रातोरात लोकप्रिय झालेल्या रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ला पाहण्यासाठी चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली आहे. रिंकू ही टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देत आहे.  
 
 
तिची लोकप्रियता आणि तिला पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती.तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल हे ठावूक असल्याने कॉलेजच्या प्राचार्या जयश्री गवळी-सातपुते यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती.
 

 
 पोलीस बंदोबस्तामुळे इतर विद्यार्थ्यांना अर्चीच्या चाहत्यांचा कोणताही त्रास झाला नसल्याचे समजत आहे. रिंकू कला शाखेतून बारावीची परीक्षा देत आहे.