आरोग्य मंत्री शिंदे उद्या मेळघाटात
   दिनांक :21-Feb-2019
-विविध शासकीय रुग्णालयांना देणार भेटी
 
अमरावती, 
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे उद्या शुक्रवार, २२ फेब्रुवारीपासून दोन दिवस मेळघाटात असून या दरम्यान ते धारणी व चिखलदरा तालुक्यातील विविध शासकीय आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच रुग्णालयांना भेटी देणार आहे.
 
 
 
शुक्रवार, २२ फेब्रुवारीला सकाळी ९.४५ वाजता सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यावर १०.३० वाजता हरिसालच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देतील. याठिकाणी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उदघाटन होणार आहे. ११.४५ वाजता राणामालूरच्या उपकेंद्राला भेट देणार आहेत. दुपारी १२.४५ वाजता धारणीच्या उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिल्यानंतर याठिकाणी विश्रामगृहावर १.३० ते २ वाजेपर्यत मुक्काम करतील. तेथून दुपारी २.३० वाजता बिजुधावडीच्या प्राथमिक आरोग्य केद्राला भेट देतील. तेथून ३.३० वाजता कळमखार या उपकेंद्रावर जातील. ५ वाजता शिरपूर उपकेंद्राला भेट देऊन लगेच साडेपाचला दिया या उपकेंद्राला भेट देऊन चिखलदर्‍याला येतील.
 
शनिवार, २३ रोजी सकाळी ९.३० वाजता चिखलदर्‍याच्या ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करतील. तेथून १० वाजता सलोना आरोग्य केंद्राला भेट देतील. १०.३० वाजता काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करतील. लगेच ११.१५ वाजता चुरणीच्या ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करतील. तेथून अचलपूरकडे प्रयाण दुपारी करतील. दुपारी २.४५ वाजता अचलपूरच्या उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण करतील. याठिकाणी दुपारी ३ वाजता आयोजित बैठकीला उपस्थित राहतील.