नेपच्यूनच्या नव्या चंद्राचा शोध
   दिनांक :21-Feb-2019
सॅक‘ामेन्टो
 
कॅलिफोर्निया विद्यापीठातील सेटी इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी नेपच्यूनच्या नव्या चंद्राचा शोध लावला असून त्याचे नामकरण ‘हिप्पोकँप’ असे करण्यात आले आहे. प्राथमिक पाहणीतून या चंद्रावर जीवसृष्टी असल्याची शक्यता वर्तवली जात असून इथे एलियन्स भेटू शकतात, अशी चर्चा वैज्ञानिकांच्या वर्तुळामध्ये आहे.
 
 
 
 
 
नेपच्यूनच्या 12 उपग्रहांचा आतापर्यंत शोध लागला असून हा 13वा उपग‘ह आहे. प्रोटियस कॉमेटपासून या चंद्राची निर्मिती झाली आहे. ग‘ीक पुराणांमध्ये ‘हिप्पोकँप’ नावाच्या एका काल्पनिक प्राण्याचा उल्लेख येतो. त्या प्राण्याचे नावच या ग‘हाला देण्यात आले आहे. ‘हिप्पोकँप’वरील वातावरण प्रचंड थंड आहे. येथील सूर्यप्रकाश आणि इतर गोष्टी जीवसृष्टीला पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच येत्या काळात इथे एलियन्स सापडू शकतील, अशी आशा शास्त्रज्ञांना वाटते आहे.