सृजन नागरीक संघातर्फे पाकिस्तानचा निषेध; शहीद जवानांना दिली श्रद्धांजली
   दिनांक :21-Feb-2019
राजुरा 
 
पुलवामा येथील हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असुन त्याचा निषेध सृजन नागरीक मंचाच्या कार्यकर्त्यांनी चप्पल,बुट या पादत्राणाने " पाकिस्तानचा निषेध " असे चित्र बनवून व ' पाकिस्तान मु्र्दाबाद ' च्या घोषणा देऊन केला.
 
 
येथील शासकीय विश्रामगृहापुढे झालेल्या निषेध सभेत शहीद झालेल्या वीर जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. आमदार अँड.संजय धोटे, खुशाल बोंडे चंद्रपुर लोकसभा क्षेत्र विस्तारक तथा राजूरा विधानसभा प्रमुख मिलींद गड्डमवार ,पुंडलीक उराडे, मेघा धोटे, विनायक देशमुख, वाघूजी गेडाम, राधेश्याम अडाणिया नगरसेवक , भाजपा शहर अध्यक्ष बादल बेले मसुद अहमद, आनंद भेंडे,पुरुषोत्तम कोसुरकर, गणेश रेकलवार,पं. स. सदस्य नैना परचाके, सुनंदा डोंगे, निकोसे,अल्का कोसुरकर, नलिनी झाडे, वंदना खरवडे, अरुणा गावत्रे, महादेव तपासे, मुखरु सेलोटे यांचेसह मोठ्या संख्येने पुरुष व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.