' सोनचिडीया ' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात
   दिनांक :21-Feb-2019
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला सोनचिडिया हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असून चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.
 
 
 
या चित्रपटाची कथा १९७५ साली लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित असून आणीबाणीनंतर चंबळमधील दरोडेखोऱ्याचे आयुष्य पूर्णपणे कसे बदलते . यावर या चित्रपटात बनविण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या चित्रपटातून चंबळची प्रतिमा मलीन करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.
चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूत,भूमी पेडणेकर, अशुतोष राणा, मनोज वाजपेयी आमि रणवीर शौरी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.