एसटी बसमध्ये बॉम्ब; कर्जत परिसरात खळबळ
   दिनांक :21-Feb-2019
कर्जतहून आपट्याकडे निघालेल्या एसटी बसमध्ये आढळलेली संशयित वस्तू बॉम्बच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वृत्तामुळे कर्जत परिसरात खळबळ उडाली आहे. काल रात्री अकराच्या सुमाराला कर्जत-आपटा एसटी बसमध्ये संशयित वस्तू आढल्यानंतर अलिबागहून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. ही संशयित वस्तू बॉम्बच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बॉम्ब निकामी करण्यात आला.
 
 
 
बॅगेत सापडलेल्या या वस्तूमध्ये ३ किलो युरिया आणि आयईडी हे स्फोटजन्य पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. कर्जत-आपटा एसटी बसमध्ये बॉम्ब असलेली बॅग कुणी ठेवली याचा तपास पोलीस घेत आहेत. त्यासाठी चालकांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
 
 
 
 
 

 
 
रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यातील सर्व एसटी बस आगारांमध्ये कसून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.