स्वप्नील जोशी झाला आम आदमी, नव्या चित्रपटातील लूक केला शेअर
   दिनांक :21-Feb-2019
अभिनेता स्वप्नील जोशी वेगवेगल्या व्यक्तिरेखा साकारण्यात माहीर आहे. तो कधी मुंबई-पुणे-मुंबई ३ मधला रोमॅंटिक नवरा असतो तर कधी रणांगणमधील सुडाने पेटलेला नायक.
 
 
स्वप्नीलचा आणखी एक नवा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या लूकमध्ये स्वप्नील फॉर्मल लूकमध्ये दिसत आहे. लाल कलरच्या स्कूटरवर लाल रंगाचे हेल्मेट घातलेला स्वप्नील एखाद्या ऑफिसला चाललेल्या ‘फॅमिली मॅन’ प्रमाणे दिसत आहे.
 
 
 
‘मोगरा फुलला’ असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. स्वप्नीलचा हा नवा सिनेमा कसा असेल याची चाहत्यांना उत्सुकता असेल यात शंका नाही. श्रावणी देवधर या चित्रपटाच्या दिग्दर्शक आहेत. तर, अर्जुन सिंग आणि कार्तिक निशाणदार या चित्रपटाचे निर्माते आहेत.