' केसरी 'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
   दिनांक :21-Feb-2019
३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत ‘केसरी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
 
 
 
 या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार परिणीती- चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे. भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई अशा शब्दात नेहमीच सारागढीच्या युद्धाचे वर्णन केले जाते. १० हजार सैन्याच्या रुपाने मृत्यू समोर असतानाही न डगमगता या २१ वीरांनी शेवटच्या श्वसांपर्यंत लढा देत आपले नाव इतिहासात सुवर्णाक्षरात अजरामर केले . या शौर्यगाथेची झलक ‘केसरी’ च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. २१ मार्च रोजी ‘केसरी’ प्रदर्शित होत आहे.