जेष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे निधन
   दिनांक :21-Feb-2019
पुणे, 
 
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. बुधवारी खासगी रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी 1 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
 

 
 
श्रीधर माडगूळकर यांचा जन्म 6 फेब‘ुवारी 1947 रोजी जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी 1970 मध्ये जिप्सी या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करून अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे धरती व साप्ताहिक मायभूमी या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले. त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. श्रीधर माडगूळकर यांची ‘आठी आठी चौसष्ट’ ही कादंबरी राजकीय क्षेत्रात मैलाचा दगड समजली जाते. गदिमांच्या आठवणींवरील मंतरलेल्या आठवणी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमधून लेखन केले होते. गोवा येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 
श्रीधर माडगूळकर यांनी गदिमांची गाणी व आठवणी, थोरली पाती-धाकटी पाती यासार‘या साहित्यिक कार्यक‘मांचे आयोजन केले. दूरदर्शन तसेच आकाशवाणीवरील अनेक कार्यक‘मात त्यांचा सहभाग असायचा. 1970 मध्ये इंटरनेटवर मराठी भाषेतील जाळे या पहिल्या साप्ताहिकाची सुरुवात करून याचे यशस्वी संपादन केले. त्यांनी सांगली जिल्हातील माडगूळे या खेडयात गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून कै.ग.दि.माडगूळकर हायस्कूल सुरू केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या विविध चळवळीत सहभाग घेतला. 1998 मध्ये पुणे शहर युवक कॉंग‘ेसचे अध्यक्षपदी व शहर कॉंग‘ेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. क‘ीडा क्षेत्रातही त्यांचा सकि‘य सहभाग होता.