काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण; ' वंदे मातरम ' म्हणण्याची सक्ती
   दिनांक :21-Feb-2019
यवतमाळ:
 
शिक्षणासाठी आलेल्या जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास वाघापूर परिसरातील वैभव नगर परिसरात घडली.
 
 
3 ते 4 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झालेले विद्यार्थी लोहारा पोलिसात तक्रार देण्यासाठी पोहोचले आहेत. युवा सेनेच्या कार्यकर्त्याची पोलिसांनकडून धरपकड सुरू.