गझलनंदा काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित
   दिनांक :22-Feb-2019
चामोर्शी कन्या व नागपूर येथील जेष्ठ कवयित्री सुनंदा पाटील यांना नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'माझा विचार आहे' या गझलसंग्रहाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरूनगर पुणे येथील पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
 
 
जेष्ठ दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या हस्ते सुनंदा ताईंचा सत्कार करण्यात आला. गझल सम्राट सुरेश भट यांची शिष्या असलेल्या सुनंदा ताई गझलनंदा या टोपणनावाने गेली ३५ वर्षे सातत्याने मराठी गझल लेखन करीत आहेत. तसेच नवोदितांना गझल तंत्राचे मार्गदर्शन करीत आहेत. कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार श्री मोहन कुळकर्णी, संतोष गाढवे, अस्मिता बोरकर, भाग्यश्री देसाई असे अनेक दिग्गज उपस्थित होते.
याच महिन्यात नुकतेच त्यांना, सह्याद्री आर्टस भोसरी पुणे, साहित्यकणा नाशिक, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि तेजस्विनी संस्था थेऊर पुणे , असे काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत आहे .