होंडा क्लासिक गोल्फ स्पर्धेतून टायगरची माघार
   दिनांक :22-Feb-2019
मेक्सिको,
आगामी ७ ते १० मार्च महिन्यादरम्यान ऑर्लण्डो-बे-हिल येथे होणार्‍या अर्नोल्ड पाल्मर आमंत्रित व प्लेयर्स गोल्फ अिंजक्यपद स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आपण पुढील आठवड्यात आयोजित होंडा क्लासिक गोल्फ स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा स्टार गोल्फर टायगर वूडने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केली.
 

 
 
अलीकडेच रविवारी पार पडलेल्या जिनेसिस ओपन गोल्फ स्पर्धेत टायगरने १५ वे स्थान मिळविले होते. त्यानंतर लगेच तो डब्ल्यूडीसी-मेक्सिको चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या फेरीत खेळायला लागला. माजी प्रथम विश्वमानांकित टायगरची ही मोसमातील तिसरी पीजीए टूर स्पर्धा आहे.