अमृताचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक
   दिनांक :22-Feb-2019
 
 
 
गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून ट्विटर, इन्स्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांमध्ये तिचा दबदबा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अमृताचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले असून अमृताने स्वत: ही माहिती दिली आहे.
 
 
 
 
“ माझे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले असून सध्या मी फोनमध्ये अॅक्टीव्ह असलेल्या इन्स्टाच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधत आहे. अज्ञात व्यक्तीने माझे इन्स्टा हॅक केले असून जर या अकाऊंटवरुन एखादा फोटो, व्हिडिओ किंवा कोणताही मेसेज आला तर तो, मी किंवा माझ्या टीममधील कोणत्याही व्यक्तीने केलेला नसेल. ज्या अज्ञात व्यक्तीने माझे इन्स्टा हॅक केले आहे, त्याने माझा मेल आयडीदेखील हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मी तक्रार दाखल केली आहे”, असा मेसेज करुन अमृताने चाहत्यांना ही माहिती दिली आहे.