माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
   दिनांक :22-Feb-2019
भंडारा :
 
 शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी वारंवार निवेदन देत आंदोलन करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने भाजपचे माजी नगरसेवक व माळी समाजाचे नेते अरुण भेदे यांनी कामगार कल्याण विभागाच्या सुरु असलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्याचा करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलीसानी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. विशेष म्हणजे त्यांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला आठ दिवसांपूर्वीच दिला होता. हे अतिक्रमण काढले जावे म्हणून अनेक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.