सरपंच सचिवांनी विनापरवाना झाडे तोडल्याची तक्रार
   दिनांक :22-Feb-2019
मंगरुळपीर,
गट ग्रामपंचायत पिंप्री,बु.,खरबी,मोझरी येथील सचिवांनी विना परवाना ग्राम पंचायत कार्यालय परिसरातील विना परवाना झाडे तोडल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
 
निवेदनात नमूद आहे की, पिंप्री ग्राम पंचायत कार्यालय परिसरात असलेल्या चाळीस ते पन्नास हजार रुपये किंमत असलेले अंदाजे सात ते आठ वृक्ष विनापरवाना तोडून सरपंच व सचिव यांनी सादर झाडांची विल्हेवाट लावली.त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा या विचाराची त्यांनी कार्यपद्धतीच बदलून टाकली आहे.म्हणून देशहिताचे संपत्ती तोडणाऱ्या सरपंच व सचिवावर कारवाई अशी मागणी करण्यात आली असून याठिकाणी साग,कडुनिंब व गुलमोहर ही झाडे होती असे निवेदनात नमूद असून निवेदनावर किशोर लांडकर, ज्ञानेश्वर खिराडे, शंकर राठोड,योगेश राठोड,रुपेश ठाकरे,संतोष ठाकरे,शैलेश राठोड,नाजूक डोंगरे,पुंडलीक खोडके,विशाल पडघाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.