नाट्यदिंडीने नाट्यसंमेलनाला प्रारंभ
   दिनांक :22-Feb-2019
डॉ. मोहन आगाशे आणि मोहन जोशी यांच्यासह भरत जाधव, अविनाश नारकर, वैभव मांगले यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधक

 
 
 
 
 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९९ व्या नाट्य संमेलनाला शुक्रवारी दुपारी ४ वाजता नाट्यदिंडीने सुरुवात झाली. अ. भा. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, कीर्ती शिलेदार, गिरीश गांधी, राजे मुधोजी भोसले यांनी नटराजाचे पूजन करून दिंडीला प्रारंभ केला. नटराज पूजनानंतर महाल गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दिंडी निघाली.
 
 
 
 
शिवाजी पुतळा, महाल, चिटणीस पार्क, बडकस चौक, कोतवाली पोलिस स्टेशन, कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक, जुनी शुक्रवारी पूलमार्गे दिंडी रेशिमबाग मैदानावरील मुख्य मंडपात पोहोचली. मुख्य मंडपाला पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच असे नाव देण्यात आले आहे. मोहन आगाशे, मोहन जोशी, अविनाश नारकर, वैभव मांगले दिंडीत सहभागी झाले होते.