आरोग्यमंत्र्यांच्या मेळघाट दौऱ्याला सुरवात
   दिनांक :22-Feb-2019
कुपोषण निर्मूलनासाठी राबविणार मोहिम
आरोग्यमंत्री शिंदे यांच्या दौर्‍याला सुरुवात
राज्यस्तरीय जंतनाशक मोहिमेचा मेळघाटातून 
अमरावती, 
 
मेळघाटमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण यंत्रणेसह आजपासून मेळघाट दौ-यावर आले असून, सेमाडोहपासून या दौ-याला प्रारंभ झाला. हरिसाल या पहिल्या डिजीटल गावातून राज्यस्तरीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभही त्यांनी आज केला. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
 

 
लहान मुलांच्या श्वसनासंबंधी संसर्गावर नेब्युलायझर हे प्रभावी साधन ठरले आहे. या यंत्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण आणि नागरिकांना सकस धान्यवाटपही यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सर्व विभागांच्या सहाय्याने कुपोषणावर मात करीत मेळघाटातील बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला.