बाल शिवाजीची गार्गी ‘महाराष्ट्र शिवरत्न’ पुरस्काराने सन्मानित
   दिनांक :22-Feb-2019
अकोला:
छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक मराठी दिनानिमित्त पुणे येथे राज्यस्तरीय प्रेरणा साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 
 
 
पुणे येथे पार पडलेल्या या साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळ्यात बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी गार्गी आशुअल्हाद भावसार ही ‘महाराष्ट्र शिवरत्न’ पुरस्काराची मानकरी ठरली.
 
गार्गीने लहान वयात विविध विषयांच्या 1500 पुस्तकांच्या केलेल्या वाचनाबद्दल तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. गार्गीला वाचनाची लहानपणापासूनच आवड आहे. तसेच तिचे स्वतःचे वाचनालय आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक,पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
तिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, संस्थेचे सचिव मोहन गद्रे, अनघा देव, मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, शोभा अग्रवाल, संगीता जळमकर, भारती कुळकर्णी व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे.