गेवराईजवळ ट्रकमधून ४५ लाखाचा गुटखा जप्त
   दिनांक :22-Feb-2019
गेवराई (बीड ) :
 
तालुक्यातील गढी जवळ हॉटेलवर उभ्या असलेल्या एका ट्रकच्या झडती दरम्यान पोलिसांनी ४५ लाखाचा ८० पोते गुटखा जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विषेश पथकाने गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता केली.

 
 
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री उस्मानाबादहून जालन्याकडे जाणारा एक ट्रक (एम.एच 18 ए.ए 6845) गढीजवळ एका हॉटेलवर थांबला. या ट्रकमधून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून रात्री २.३० वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने येथे छापा मारला. ट्रकच्या तपासणीत ४५ लाखाचा ८० पोते गुटखा आढळून आला.