आशियाई हॉकी महासंघावर मुश्ताक अहमद, असिमा अली
   दिनांक :22-Feb-2019
नवी दिल्ली,
आशियाई हॉकी महासंघाच्या उपाध्यक्षपदी मोहम्मद मुश्ताक अहमद व कार्यकारिणी सदस्य म्हणून असिमा अली यांची अविरोध निवड झाली आहे. ऑक्टोबर २०१८ पासून मुश्ताक अहमद हे हॉकी इंडियाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी हॉकी इंडियाचे महासचिवपदसुद्धा भूषविले आहे.
 

 
 
हॉकी जम्मू-काश्मीरच्या असिमा अली ह्या ऑक्टोबर २००८ पासून हॉकी इंडियाच्या उपाध्यक्षपदावर आहेत. या विजयामुळे आता मुश्ताक अहमद व असिमा हे आशियाई हॉकी महासंघाच्या विधी समितीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणून कार्य करतील. त्यांच्या या निवडीबद्दल हॉकी इंडियाचे महासचिव राजिंदर सिंग यांनी आनंद व्यक्त केला व त्यांचे अभिनंदन केले आहे.या दोघांनी देशभरात हॉकीला प्रोत्साहन देण्यासाठी अविश्रांत परिश्रम केले. त्याच्यामुळेच महासंघात हॉकीला व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहेत, अशा शब्दात त्यांचा गौरव केला.