नाट्यसंमेलनाचे आज उदघाटन; नाट्यदिंडीने होणार सुरुवात
   दिनांक :22-Feb-2019
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99 व्या नाट्य संमेलनाला आज दुपारी 3 वाजता नाट्यदिंडीने सुरुवात होणार आहे.
नाट्यदिंडीचा मार्ग शिवाजी पुतळा, महाल - चिटणीस पार्क - बडकस चौक - कोतवाली पोलिस स्टेशन - कल्याणेश्वर मंदिर - झेंडा चौक - जुनी शुक्रवारी पूल - कविवर्य सुरेश भट सभागृह - रेशिमबाग मैदानावरील पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच आहे.
 
नाट्य संमेलनाच्या दिंडीमध्ये नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. दिग्दर्शक- अभिनेते महेश मांजरेकर, डॉ. गिरीश ओक, डॉ. विलास उजवणे, शरद पोंक्षे, मोहन जोशी, विजय गोखले, भरत जाधव, विनय येडेकर, विजय चौगुले यांच्यासह अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि सुकन्या मोने यांचा दिंडीत सहभाग राहणार आहे.