मनपाच्या महासभेत पोहोचले पोलिस
   दिनांक :22-Feb-2019
अकोला,

 
 
प्रलंबित असलेली मनपाची महासभा शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुरू झाली. या महासभेत अमृत योजनेबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान महासभेत शिवसेना गटनेते राजेश मिश्रा, गजानन चव्हाण यांनी तोडफोड केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. महासभा सुरू असताना सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले असून तब्बल 1 तास सभागृहाचे कामकाज बंद होते. नंतर नियमित काम सुरू झाले.