पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान; पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार
   दिनांक :22-Feb-2019
 दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण दौऱ्यावर आहेत. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 
 
 
 
नरेंद्र मोदींनी पुरस्कारासोबत १ कोटी ३० लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न, नोटाबंदी, वैश्विक शांततेसाठी केलेल्या कार्यासाठी नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 
 
 
 
 
पुरस्कार मिळाल्यानंतर मोदींनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून सर्व भारतीयांचा आहे. गेल्या पाच वर्षात भारताने जे यश मिळवले आहे त्याचा सन्मान आहे. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी झाली त्याच वर्षी हा पुरस्कार मिळणे माझं भाग्य आहे’. असे त्यांनी सांगितले.