पुलवामा हल्ला अक्षम्य आणि भ्याड; संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केले निषेध
   दिनांक :22-Feb-2019
 पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसलळेली आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याविरोधात भारताला साथ मिळू लागली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि भ्याड असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला आहे. सुरक्षा परिषदेने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत अशा निंदनीय हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा सुरक्षा परिषदेने व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पारित केलेला हा ठराव हा पाकिस्तानला धक्का असल्याचे मानले जात आहे.
 
 
 

 
 
संयुक्त राष्ट्रांमध्ये पारित करण्यात आलेल्या या प्रस्तावाचे वैशिष्ट्य म्हणजे या सुरक्षा परिषदेने आपल्या प्रस्तावामध्ये दहशतवादी मसूद अझहर याच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे. या सुरक्षा परिषदेमध्ये चीनचाही समावेश आहे.  पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्यांविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सहकार्य करावे असे आवाहनही सुरक्षा परिषदेने या प्रस्तावाच्या माध्यमातून केले आहे.
\