रणबीर कपूर आणि रणवीर सिंग दिसणार
   दिनांक :22-Feb-2019
बॉलिवूडमधील दोन आघाडीचे कलाकार  रणवीर आणि रणबीर एकाच पडद्यावर दिसावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा काही अंशी पूर्ण होणार आहे. रणवीर आणि रणबीर लवकरच एकत्र झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
 
बॉलिवूडमधील हे दोन्ही सुपरस्टार कोणत्याही चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार नसून एका जाहिरातीसाठी एकत्र येणार आहे. ही एका शितपेयाची जाहिरात आहे. यासाठी या ब्रॅण्डने दोघांशी संपर्कही साधला आहे. मात्र अद्यापतरी या दोघांकडून  उत्तर आलेले नाही.
दरम्यान, रणवीर आधीपासूनच या ब्रॅण्डचा सदिच्छादूत आहे. परंतु ही कंपनी रणबीरला रणवीरसोबत गेस्ट रोलमध्ये आणू इच्छिते. इतकेच नाही तर यासाठी कंपनीने रणबीरला मोठी रक्कमही ऑफर केल्याचे सांगण्यात येत आहे.  मात्र रणवीर आणि रणबीर एकत्र झळकणार की नाही याविषयी अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.